शहरात गस्त वाढवा,भाजपा पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे मागणे
दोडामार्ग/सुमित दळवी ता.१६: शहरात खालचीवाडी धाटवाडी परिसरात दोन दुकाने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न अज्ञात चोरटा कडून करण्यात आला.मात्र त्यांच्या हाती काही लागेल नाही.दरम्यान वाढत्या चो-यांची संख्या लक्षात घेता पोलिसांनी शहरात योग्य तो बंदोबस्त ठेवावा,गस्त वाढवावीअशी मागणी भाजपच्या वतीने आज येथे करण्यात आली.
याबाबत पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष योगेश महाले,उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, समीर रेडकर, सुमित म्हाडगुत,राजेश फुलारी आदी उपस्थित होते.
यावेळी शहरातील वाढत्या चो-यांची संख्या लक्षात घेता पोलिसांनी गस्त घालावी.आवश्यक ठिकाणी रात्रीचा पोलिस बंदोबस्त ठेवावा.संशयास्पद फिरणाऱ्या लोकांवर लक्ष द्यावा अशा विविध मागण्या यावेळी पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आल्या.