युवक काँग्रेसच्या कणकवली तालुका अध्यक्षपदी अभिषेक मेस्त्री यांची निवड

161
2

 

कणकवली, ता.१६ :कणकवली तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कसवण तळवडे येथील अभिषेक मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली कार्यलयात महारष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवानंद लुबडे यांनी नियुक्तीपत्र देत हि निवड केली आहे. दिलेल्या पदाचा योग्य सन्मान ठेवून काँग्रेस पक्ष वाढीसाठी मोलाचे योगदान देण्याचे आव्हान या पत्रकाव्दारे केले आहे.
दिलेल्या पदाला योग्य न्याय देवून पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिषेक मेस्त्री यांनी सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सावंत,उपाध्यक्ष संजय राणे,सरचिटणीस राजेंद्र पेडणेकर,प्रवीण वरुणकर,निलेश मालंडकर,नेहा मालंडकर,पल्लवी तारी,अरविंद मोंडकर,रवी तेली,महेश तेली,अक्षय मेस्त्री,निखिल मेस्त्री,दीपक यादव,परशुराम मेस्त्री आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

4