सुशांत नाईक यांच्यासह विरोधी पक्ष नगरसेवकांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट
कणकवली, ता. १६ : गणेशोत्सव काळात कणकवली शहरात कोणत्याही व्यक्तीची गैरसोय होणार नाही. तसेच हायवे लगत असणाऱ्या गाड्यासाठी जागा ठरवा. फिरते विक्रेते, भाजी विक्रेते यांना जागा उपलब्ध करून द्या. गणेश विसर्जन स्थळांची स्वच्छता, मुख्य रस्त्याच्या बाजूला वाढलेले गवत कटींग, रस्त्यावरील खड्डे बुजवा अशा आदी सूचना नगरसेवक सुशांत नाईक व रुपेश नार्वेकर यांनी न.पं.चे नूतन मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची भेट घेवून केल्या. यावेळी श्री.पिंपळे यांनी काही दिवसातच मिटिंग घेवून त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
न.पं.च्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे शुक्रवारी अतुल पिंपळे यांनी हाती घेतली.त्याबद्दल त्यांची भेट घेत. नगरसेवक सुशांत नाईक,रुपेश नार्वेकर,मानसी मुंज,योगेश मुंज यांनी पुष्प गुच्छ देवून अभिनंदन केले.
मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर अतुल पिपळे यांची न.प.च्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती केली आहे.यापूर्वी ही सन २०१०ते २०१३ या कालावधीत त्यांनी मुख्याधिकारी पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती.आता पुन्हा एकदा कणकवली न.प.चा कारभार चालविण्याची संधी त्यांना मिळाली आहे.या निवडीमूळे शहराला सक्षम अधिकारी मिळाल्याने प्रलंबित कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगितले.
कणकवलीत गणेशउत्सवाच्या निमिताने तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरील छोटे-मोठे विक्रेते रोजी रोटी साठी कणकवलीत भाजी,फळे,फुले व अन्य साहित्याचा व्यवसाय करतात.संपूर्ण महाराष्ट्र्रात निर्माण झालेल्या पूर स्थिती मुळे गेले १० ते १२ दिवस संपूर्ण आर्थिक व्यवहाराच कोलमडला होता. या पार्शवभूमीवर या छोट्या विक्रेत्याना गणेशउत्सव सण साजरा करता यावा व कणकवलीत बाजारसाठी येणाऱ्या नागरीकांना सहज रित्या साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी माणुसकीच्या भावनेतून न.पं.ने या विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करावी याकडे हि लक्ष वेधण्यात आले.