सरकारी वकील पदी संदेश तायशेटे यांची नियुक्ती…

381
2

सिंधुदुर्गनगरी त.१६: जिल्हा न्यायालयात सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता म्हणून कुडाळ येथील प्रथितयश वकील संदेश कृष्णा तायशेटे यांची नियुक्ती झाली आहे. तर सहाय्यक सरकारी वकील व सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी कणकवली येथील वकील संदीप अशोक राणे आणि पाट ता कुडाळ येथील रूपेश विट्ठल देसाई यांची नियुक्ती झाली आहे. या तिघांनीही नुकताच पदभार स्वीकारला आहे.
जिल्हा न्यायलयात सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत असलेले वकील सूर्यकांत खानोलकर तसेच सहाय्यक सरकारी वकील व सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वप्निल सावंत आणि अवदूत भणगे यांची मुदत संपल्याने त्यांच्या जागी सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता म्हणून कुडाळ येथील प्रथितयश वकील संदेश कृष्णा तायशेटे यांची नियुक्ती झाली आहे. तर सहाय्यक सरकारी वकील व सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी कणकवली येथील वकील संदीप अशोक राणे आणि पाट ता कुडाळ येथील रूपेश विट्ठल देसाई यांची नियुक्ती झाली आहे. या तिघांनीही १४ ऑगस्ट रोजी आपल्या या पदांचा पदभार स्वीकारला असुन शुक्रवार १६ ऑगस्ट पासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे.

4