सिंधुदुर्गनगरीत स्वातंत्र्यदिन विविध मागण्यांसाठी एकूण १५ उपोषणे…

232
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.१६; आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी स्वातंत्र दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ तर जिल्हा परिषद भवनासमोर २ अशी एकूण सिंधुदुर्गनगरीमध्ये १५ उपोषणे छेडण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी अधिकृत वाहनांना परमिट मिळावे या मागणीसाठी टेम्पो ट्रॅव्हल्स चालक-मालक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून लक्ष वेधले. संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत तेली, दत्‍ताराम सावंत, गोपाळ गुडेकर, रामचंद्र सुकी, राजेंश सावंत, प्रीतम पांढरे, अभिषेक मेस्त्री, साईश कारवारी आदी शेकडो टेम्पो ट्रॅव्हल्स चालक मालकांनी या उपोषणात सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांनी पर्यटनातून रोजगार साधण्याकरता प्रवासी वाहतूक करण्याच्या उद्देशाने वाहन खरेदी केलेली आहे. आम्ही शासनाकडून आवश्यक असणारी परमिट घेऊन धंदा करतो. मात्र परमिट टॅक्स मुळे हैराण व्हायला होते. त्यामुळे फोर व्हीलर वाहन याप्रमाणे टॅक्स आकारणी व्हावी अशी त्यांनी मागणी केली व ऑनलाइन परमिट ची व्यवस्था करावी. पर्यटन जिल्हामुळे जिल्हा परमिट किंवा महाराष्ट्र परमिट द्यावे, आरटीओ कार्यालयात टेम्पो ट्रॅव्हल्स कोणत्या आधारे पासिंग करून दिल्या जातात याची चौकशी व्हावी, परजिल्ह्यातून तसेच गोवा राज्यातून प्रवासी गाड्या खाजगी पासिंग करतात. त्यामुळे जिल्ह्यात अवैध प्रवाशी वाहतूक होते. त्यामुळे परमिट धारकाला त्रास होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असून तो परजिल्ह्यात आपला खोटा पत्ता दाखवून गाडी खाजगी पासिगकरून आणतात त्याची चौकशी व्हावी, दशावतारी मंडळाच्या गाड्याही विनापरवाना व्यवसाय करतात याबाबत चौकशीची मागणी त्यांनी यावेळी केली. पालकमंत्री दीपक केसरकर यासह आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्याबाबत तोडगा काढला जाईल असे सांगितले.

रस्ता पाणी व विविध शासकीय योजनेसाठी काळसे धनगर वाडी ग्रामस्थांचे उपोषण

रस्ता, पाणी व वीज, शासकीय योजनेपासून गेले कित्येक वर्ष वंचित राहिलेल्या मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. उपोषणकर्त्यांची पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, सीईओ के मंजूलक्ष्मी यांनी भेट घेतली. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे हेही उपस्थित होते. येथील धनगरवाडीतील रहिवाशांचे म्हणणे असे आहे की पाणी रस्ता व विविध शासकीय योजना पासून गेली सत्तर वर्षे आम्ही वंचीत आहोत. कित्येक वेळा पाठपुरावा करून देखील कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. काळसे धनगरवाडी ही मुख्य रस्त्यापासून तीन किमी अंतरावर डोंगराळ भागात वसलेली आहे. तेथे जाण्यासाठी सध्या पायवाटेची सुद्धा सुविधा नाही. गेली पंचवीस वर्ष या सर्व मागण्यांसाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी कितीतरी वेळा शासन दरबारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याजवळ उपोषणे निवेदने पर्यायी मोर्चे देखील काढले. परंतु याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. आता कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता जोपर्यंत मागण्यांच्या कामाला सुरुवात होत नाही तो पर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत असे उपोषण करते सुनील वरक आणि ग्रामस्थांनी सांगितले पुरुष महिलांसह ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले होते या मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हा परिषदेमध्ये घुसून न्याय मागणार असा इशारा धनगर समाजाचे नेते. किशोर वरक यानी दिला.

थकित वेतन मिळण्यासाठी बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांचे उपोषण

थकित वेतन मिळण्यासाठी बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले व थकित वेतन द्या अशी मागणी केली. कंत्राटी कामगार संघटनेचे चंद्रहास राणे, दत्तात्रय मेस्त्री, गंगाराम जाधव, वामन बांबर्डेकर, विकास पेडणेकर आदी शेकडो कंत्राटी कामगारांनी सहभाग घेतला. नोवेंबर 2018 ते जून 2019 या कालावधीचे हे वेतन थकीत आहे. नियुक्त दोन ठेकेदार यापैकी सिंग कंट्रक्शन पुणे या कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना आठ महिन्यांची थकीत वेतन अद्याप मिळाले नाही. तर नवी मुंबई येथील डीएम इंटरप्राईजेस या ठेकेदाराकडून मार्च ते जून 2019 चे चार महिन्याचे थकीत वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक कामगारांचे नोव्हेंबर व डिसेंबर 2017 या दोन महिन्याची थकीत वेतन अद्याप दिले नाही. मात्र याबाबत लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत आमची कुणी दखल घेतली जात नसल्याचा आरोप या कामगारांनी केला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पडेल ग्रामस्थांचे उपोषण

देवगड तालुक्यातील पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश पाटील यांची बदली होऊन नवीन डॉक्टर व कर्मचारी भरती होण्यासाठी पडेल ग्रामस्थ संदीप वाडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. डॉक्टर पाटील हे गेली सतरा वर्षे पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेत असून वढ्या वर्षात त्यांनी दुसर्‍या कोणत्याही सहकारी डॉक्टर समजवून घेतले नाही. केंद्रात दुसरा डॉक्टर येण्यास तयार होत नाही. सतरा वर्षात कायम स्वरूपाची त्यांची बदली का होत नाही असा सवाल ग्रामस्थांनी केला. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी व उपोषण करूनही प्रशासनाने आजपर्यंत या डॉक्टरांना पाठीशी घालून नागरिकांना त्रास देण्याचे काम केले आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

विद्युत वाहिनी शिफ्टिंगसाठी पालव यांचे उपोषण

मुळदे पनवाडी येथील विद्युत वाहिनी शिफ्टिंग होत नसल्याने शिवराम पालव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषण केले. या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यता देऊन महावितरण कार्यालयाकडे निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र या कामासाठी ठेकेदार नेमणूक करून विद्युत वाहिनी शिफ्टिंग काम पूर्ण करण्यात आलेली नाही. ही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही त्यामुळे न्याय मागणीसाठी हे उपोषण केले असल्याचे पालव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तळवडे जलस्वराज्य प्रकल्पातील दोषींवर कारवाई साठी उपोषण

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे जलस्वराज्य प्रकल्पातील दोषींवर कारवाई साठी तळवडे येथील ग्रामस्थ उत्तम भगवान परब यांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर गुरुवारी उपोषण केले. तळवडे पलीकडची केरवाडी सन 2005 पासून जलस्वराज्य प्रकल्पाबाबत संबंधित अधिकारी यांच्या जवळ पत्रव्यवहार करून सुद्धा न्याय मिळाला नाही. याबाबत चौकशी समिती नेमून चौकशी समितीने अहवाल सादर केला. तरीपण अहवालाच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. आजमितीपर्यंत कवडे ग्रामपंचायतीकडे प्रकल्प हस्तांतरित झालेला नाही. सद्यस्थिती तळवडे गावात अकराशे वीस कनेक्शन असून त्यातील 870 कार्यरत आहेत. उर्वरित 250 कनेक्शन बंद करावी लागली. सध्या तळवडे गावात चार ते पाच दिवसांनी पाणी सोडावे लागते. तरी तळवडे जलस्वराज्य प्रकल्पाचे रेकॉर्ड झालेल्या कामाची वाडीत प्रकल्पावर झालेल्या खर्च याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली

रस्त्यासाठी आकेरीकशेल वाडी ग्रामस्थांचे उपोषण

आकेरी कशेलवाडी येथील गेली दोन वर्षे डांबरी रस्ता बंद असल्या प्रकरणी ग्रामपंचायत अकेरी यांच्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी उपोषण करून लक्ष वेधले. योगेश देऊलकर व कशेलवाडी ग्रामस्थ यात सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केली जाते व रस्ता तात्पुरता खुला केल्यावर पुन्हा बंद करण्यात येतो असा खेळ गेले काही महिने सुरू आहे. रस्ता नसल्याने स्थानिक रहिवाशांची अडचण निर्माण झाली आहे. संबंधितावर गुन्हा दाखल करावा रस्ता दहावीसाठी खुला झाल्याबाबत प्रशासकीय फलक लावावा व भुमिअभिलेख करून मोजणी करून घ्यावी अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या.

आश्वासनाची पूर्तता न झाल्याने नेरूर समतानगर ग्रामस्थांचे पुन्हा उपोषण

नळ योजनेबाबत आश्वासन देऊनही त्याची पूर्तता झाली नसल्याने नेरूरसमतानगर ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण केले. नेरूरसमता नगर येथील नळ पाणी उदभवाचे काम हाती घेण्यासाठी 26 जानेवारी 20 फेब्रुवारी रोजी अनिल नेरूरकर यांनी उपोषण केले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र आजमितीपर्यंत काम मार्गी लागले नसल्याने पुन्हा या ग्रामस्थांनी उपोषण करून लक्ष वेधले. नळपाणी उत्सवाचे काम हाती घ्यावे शेत विहिरीवर शेतीपंप मंजूर करावा शेत विहिरीवर नामफलक लावावा ग्रामपंचायतीची चौकशी करावी आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

सेवानिवृत्त पोलिसाचे अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण

सेवानिवृत्त पोलीस रमेश सगुन राणे यांनी रेडी येथील घराजवळील बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी गुरुवारी उपोषण केले. त्यांच्या वडिलोपार्जित सामायिक एक भागात बेकायदेशीर अतिक्रमण करून स्लॅबचे बांधकाम करून गॅलरी काढलेली आहे ती काढून पुरवत जागा खाली करून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याबाबत ग्रामपंचायत विभागाने यावर तोडगा काढला जाईल असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी सांगितले त्यामुळे त्यांनी हे उपोषण मागे घेतले.

केळुस टाँवर प्रश्नीउप सरपंच आबा खवणेकर यांचे भरपावसात उपोषण

केळूस येथील मोबाईल सुरु करण्याकरिता उपसरपंच तथा पत्रकारकृष्णा उर्फ आबा  खवणेकर यानीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून लक्ष वेधले. 2018 मध्ये हातावर बांधला होता तो बंद स्थितीत असून खासदार विनायक राऊत यांनी या टॉवरचे उद्घाटन केले असल्याचे खवणेकर यांनी पत्रकारांना सांगितले. पालकमंत्री दिपक केसरकर यांनी 15 दिवसांत जिटीएलचा टाॅवर सुरू करतो असे तोंडी आश्वासन दिले.मात्र तोंडी आश्वासनांवर विश्वास नाही, लेखीच हवे  असे सांगून आबा खवणेकर आपल्या उपोषणावर ठाम राहिले.

व्यापारी संकुलासाठी स्वातंत्र्यदिनी केले उपोषण

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण यामुळे ओरस जिल्हा मुख्यालय येथील व्यवसायिक विस्थापित झाले असून या व्यापारी व्यावसायिकांना नियोजित व्यापारी संकुलामध्ये दुकान गाळे मिळावे या मागणीसाठी व्यापारी असोसिएशन ओरोस बुद्रुक सिंधुदुर्गनगरी येथील सर्व व्यापारी व्यवसायिकांनी गुरुवारी स्वातंत्र्यदिनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून लक्ष वेधले. महामार्ग चौपदरीकरण यामुळे ओरस मधील व्यवसायिक विस्थापित झाले आहे त्यांचे व्यवसाय बंद होण्याची वेळ आली आहे याबाबत व्यापारी संकुलात गाळे मिळावे यासाठी ते गेले वर्षभर झगडत आहेत मात्र प्रशासनाकडून त्यांची दात फिर्याद घेतली जात नसल्याने आज त्यांनी उपोषण करून लक्ष वेधले यावेळी पांडुरंग मालवणकर महादेव परब अर्जुन अमृतकर आनंद पिंगुळकर प्रशांत राणे राजन चव्हाण सचिन परब धनंजय गावडे सचिन मांजरेकर कुलदीप अणावकर राजन तवटे आदी दोनशे व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले या उपोषणकर्त्यांची भेट पालकमंत्री केसरकर यांनी घेत आणि शुक्रवारी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याने उपोषण मागे घेतले.

हायवे मूल्यांकनासाठी ज्येष्ठ नागरिकांचे उपोषण

हुमरमळ्यातील इमारत भुमी अभिलेख ने संयुक्त मोजनी घेऊन मूल्यांकन करण्यासाठी हुमरमळा येथील ज्येष्ठ नागरिक गजानन पालव यांनी उपोषण करून लक्ष वेधले. महामार्ग चौपदरीकरणात हुमरमळा येथील पालव यांच्या मालकीची जमीन गेली आहे मात्र अद्याप मूल्यांकन झाले नसल्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला.

वंचित बहुजन आघाडी चे आंदोलन

वंचित बहुजन आघाडी ने विथ प्रलंबित मागण्यासाठी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून लक्ष वेधले. जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी सांगितले की अस्पृश्यता वाचक जातीवाचक नावे असलेल्या वस्तीची नावे तात्काळ बदलण्यात यावी अनुसूचित जाती आणि जमाती यांची जातीचे दाखले मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करून घ्यावा आणि अंमलबजावणीबाबत चर्चा करावी जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी निर्माण होणाऱ्या समाज मंदिर प्रकरणे मंजूर होऊनही कामात दिरंगाई होत आहे याबाबत त्यांनी लक्ष वेधले यावेळी विविध अशा वीस मुद्द्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

वनीकरणाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

वनीकरणाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांना कसाल पैशातील ग्रामस्थांनी साकडे घातले ज्येष्ठ नागरिक मधुकर राणे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता यावेळी त्यांनी सांगितले की मुंबई-गोवा महामार्ग 66 चे बांधकाम सुरू झाल्यानंतर रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली पूर्वाश्रमीची मोठमोठी झाडे तोडावी लागली सुमारे 400 किमी नाम अंतरावरील झाडे तोडावी लागल्यामुळे फार मोठी पर्यावरण हानी झाली पर्यावरण संतुलन राखले जावे आणि झालेली पर्यावरण हानी भरून निघावी या उदात्त हेतूने शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने खास वृक्षलागवड मोहीम जाहीर केली या अनुषंगाने शासन नुकसान नुसार वृक्षलागवड करण्यात आली मात्र शेतकऱ्यांना दोन वर्षात एक रुपया सुद्धा अनुदान मिळालेले नाही याबाबत सामाजिक वनीकरण विभागाकडे चौकशी केली असता त्वस उत्तर कोणीही अधिकारी देत नाही याप्रकरणी दिशा पूर्व फसवणूक झाली की काय असे सांगत त्यांनी आंदोलन केले या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिले

हेवाळे ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी उपोषण

दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उदय जाधव यांनी स्वातंत्र्यदिनी उपोषण केले सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरू होते या ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी आपण अनेकदा अर्ज निवेदने दिली मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते असे म्हणणे जाधव यांचे आहे त्यामुळे आपण उपोषण लक्ष वेधत असल्याचे सांगितले.

\