असनिये-घारपी मधील स्थलांतरित कुटुंबांना उद्या घरी पाठवणार

171
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

दीपक केसरकर: दरड बाजूला करून रस्ता खुला करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न

ओटवणे/दत्तप्रसाद पोकळे
आंबोली घाटाप्रमाणे असनिये-घारपी मार्गावरील दरड बाजूला करून हा मार्ग अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.तोपर्यंत घारपी येथील शाळकरी मुलांची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.कणेवाडी येथील स्थलांतरित कुटुंबाना घरी पाठवण्याचा निर्णय उद्यापर्यंत घेतला जाईल, असे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी शनिवारी असनिये येथे स्पष्ट केले.
पालकमंत्री दिपक केसरकर यांनी शनिवारी दरड कोसळलेल्या असनिये-घारपी मार्गाची पाहणी केली.अजूनही या मार्गावरील दरड पूर्णपणे हटविण्यात आलेली नाही.त्यामुळे घारपी येथील एस. टी सेवा बंद आहे.या पार्श्वभूमीवर आंबोली घाटाप्रमाणे येथील दरड हटवून तो मोठ्या वाहनांसाठी खुला करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.घारपी येथे एस. टी सेवा बंद झाल्याने घारपी व कणेवाडी येथील शाळकरी मुले व रूग्ण यांचे हाल झाले आहेत.त्यामुळे दरड पूर्णपणे हटवून वाहतूक खुली होईपर्यंत,शाळकरी मुले यांची समस्या सोडविण्यात यावी,अशी मागणी घारपी ग्रामस्थांनी श्री.केसरकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली.जोपर्यंत एस टी सेवा सुरू होत नाही तोपर्यंत घारपी व कणेवाडी येथील शाळकरी मुलांची पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे पालकमंत्री केसरकर म्हणाले.
येथील दरडींबाबत भूगर्भ तज्ज्ञांचा उद्यापर्यंत अहवाल येणार आहे.त्यानंतर कणेवाडी येथील स्थलांतरित कुटुंबाना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी येथे स्पष्ट केले.
आपदग्रस्थाना शासनाकडून देण्यात येणाऱ्या तात्काळ मदतीच्या 10 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.29 कुटुंबियांना हे धनादेश देण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, चंद्रकांत कासार, गणेशप्रसाद गवस,दीपक गावडे,संजय सावंत,सचिन कोलते,संभाजी कोलते,आपा सावंत,आनंद ठिकार,विनायक कोळापटे,विलास गावडे,सुनील गावडे,आनंद गावडे तसेच कणेवाडी व घारपी ग्रामस्थ उपस्थित होते.

\