रंगमंचावर अवतरली भारतमाता : आगळा वेगळा स्वातंत्रोत्सव
वेंगुर्ले ता.१६:
खानोलीत नारळीपौर्णिमेच्या वार्षिक उत्सवाचे औचित्य साधुन खानोली पंचायतनातील समस्त खानोली वासियाच्या सकल्पनेतुन अध्यात्मिक डबलबारीचा सामना भजनरत्न भालचंद्र केळूसकर बुवा आणि सुशिल गोठणकर बुवा यांच्यात रवळनाथ मंदिराच्या रंगमचावर साजरा झाला. मात्र रात्री बारा वाजता भारताचा स्वंतत्रोत्सव साजरा करताना या डबलबारीच्या माध्यमातून देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवत रंगमंचावर झालेले भारतमातेचे दर्शन हा या डबलबारीचा कौतुकाचा विषय ठरला.
खानोली येथील या नारळीपौर्णिमा उत्सवात श्री देव रवळनाथाची उत्सवमुर्ती अश्वारुढ असते आणि भाविकासाठी ही पर्वणी असते. याच पर्वणीचा लाभ भाविकांसोबतच भजन रसिकानी घेत या डबलबारीचाही आनंद लुटला. डबलबारी सामना सुरू झाला आणि बारी रंगात आली. आता गजर सुरू होणार असे वाटले परंतु ज्या प्रमाणे गजर असतो अर्थात डबलबारी चा तसा न होता रात्रौ ११.४५ ला माईक घेऊन सुद्धा केळुसकर बुवा यांनी गजर चालू न करता भारत पाकिस्तान-काश्मीर कलम ३७० या विषयावर बोलायला सुुरवात केली. उपस्थितांना प्रथम काहि कळले नाही पण ज्यावेळी १२ वाजले तेव्हा नक्की कारण कळल. रंगमंचामागील पडदा सोडण्यात आला आणि रंगमंचावर भारतमाता अवतरल्या. त्याचवेळी जयोस्तुते हे समर गीत बोलण्यात आले आणि वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी या सकल्पनेचे दोन्ही बुवांनी कौतुक करत हा खानोलीवासियांचा आदर्श जिल्हावासियानी घ्यावा असे उद्गार काढले. तसेच आपल्या डबलबारीतील हा सुवर्ण क्षण होता सांगत आयोजकाना धन्यवादही दिले. या डबलबारी मध्ये दोन्ही बुवानी एकमेकांवर टीका टिपण्णी न करता भारतीय संस्कृती, संत परंपरा, संगीतातील राग, नाट्यसंगीत, देशभक्ती या विषयावर मार्गदर्शन व प्रभोधन करीत हरिनाम केले आणि एका वेगळ्याच डबलबारी भजनाचा नजराणा उपस्थितांना मिळवून दिला. या आयोजनात समस्त पंचायतनातील ग्रामस्ता सोबतच विलास सावंत, गोपाळ राऊळ, अण्णा खानोलकर, रामनाना खानोलकर, सुनिल सावंत, गणपत केरकर, दिपक खानोलकर आदींचे योगदान लाभले.