भरधाव जाणा-या एसटी चालकाने दोन गाड्यांना ठोकरले…

1327
2
Google search engine
Google search engine

इन्सुली व सावंतवाडीतील प्रकार:बसचा पाठलाग करणारे इनोव्हातील युवक ताब्यात…

सावंतवाडी ता.१६: इन्सुली येथे झालेल्या अपघातात इनोव्हा कारला ठोकर देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एसटी चालकाने पुन्हा सावंतवाडीत डंपरला धडक दिल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान तपासणीत बस मध्ये दारू आढळून आली आहे.
हे दोन्ही अपघात आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडले.महादेव धर्णे रा. कुडाळ असे या चालकाचे नाव आहे.त्याची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.याप्रकरणी इनोव्हा मधील युवकांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून एसटी चालकावर अपघाताचा व दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोते यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की,धर्णे हा आपल्या ताब्यातील एसटी बस घेऊन पणजी ते कुडाळ असा प्रवास करत होता. गाडीत सुमारे चाळीसहून अधिक प्रवासी होते.तो इन्सुली येथे आला असता समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला त्याने धडक दिली. त्यामुळे त्या कार चालकाने त्याचा पाठलाग सुरू केला.यावेळी सावंतवाडीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याची धडक सावंतवाडी पोलीस स्टेशन समोरून जाणार्‍या डंपर ला बसली.त्यामुळे त्या एसटी चालकाला बस्स पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी बसची तपासणी केली असता गाडीत दारूचे बॉक्स असल्याचे समजते,मात्र ते आपल्याला माहित नाही असे चालक व वाहक यांचे म्हणणे आहे.दरम्यान याप्रकरणी इनोव्हातील युवकांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.