जीवनावश्यक साहित्याचे केले वाटप…
मालवण, ता. १६ : मुंबई येथील चारकोप कांदिवली परिसरातील तरुणांनी काळसे बागवाडी येथील पुरग्रस्तांना मदत म्हणून जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
काळसे माळकेवाडीतील मुंबईस्थित सुपुत्र श्यामसूंदर मालवणकर यांच्या विनंतीवरून मुंबईतील या तरुणांनी थेट बागवाडी येथे येवून मदत दिली. यावेळी तांदूळ, पीठ, मीठ, साखर, बिस्किटे, तेल साड्या, कोलगेट, मॅगी आदी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून शालेय मुलांना वह्या पुस्तकांसाठी ३ हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात आले.
यावेळी श्यामसुंदर मालवणकर, प्रथमेश परब, प्रशांत सोनार, अनिकेत परब, सुधीर परब, तुषार गावकर, अभिषेक परब, जितेंद्र वाक्कर, सर्वेश चाळके, संतोष सावंत, अमित मालवणकर, तुकाराम केळजी, दिपक कोरगांवकर, सुधाकर कोरगांवकर, लक्ष्मण माडये, नितीन माडये, अनिल कोरगांवकर, सुनिल कोरगांवकर, निर्मला तळगावकर, मनीषा तळगावकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.