Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामर्डे, देऊळवाडा, बिळवस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १० तर सदस्य पदांसाठी ३१ अर्ज...

मर्डे, देऊळवाडा, बिळवस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १० तर सदस्य पदांसाठी ३१ अर्ज दाखल… १९ ऑगस्टला छाननीनंतर होणार चित्र स्पष्ट : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भाजपकडून आक्षेप…

मालवण, ता. १६ : तालुक्यातील मर्डे, देऊळवाडा, बिळवस या तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या तीन जागांसाठी दहा उमेदवारी अर्ज तर २५ सदस्यांच्या जागांसाठी ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १९ ऑगस्टला उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान मर्डे ग्रामपंचायती साठीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, गणेश कुशे यांनी आक्षेप घेत याबाबतची तक्रार तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे केली आहे.
मर्डे, देऊळवाडा, बिळवस या तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक ३१ ऑगस्टला होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे या तिन्ही ग्रामपंचायतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उमेदवारांनी पंचायत समितीत गर्दी केली होती.
सात सदस्य संख्या व सरपंच पद असलेल्या देऊळवाडा ग्रामपंचायतीसाठी प्रभाग एकमधून मनीषा महेश बागवे, मीनल दीपक तांबे, प्रभाग क्रमांक दोनमधून चंद्रकांत बापू राणे यांनी दोन उमेदवारी अर्ज, प्रभाग तीनमधून नरेंद्र गोविंद सावंत, वर्षाराणी बलवंत अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक दोनमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने हे पद रिक्त राहिले आहे. सरपंच पदासाठी अदिती अमोल मेस्त्री यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरविंद घाडी यांनी काम पाहिले.
सात सदस्य संख्या व सरपंच पद असलेल्या बिळवस ग्रामपंचायतीसाठी प्रभाग क्रमांक एकमधून रंजना रोशन पालव, राजाराम हरिश्‍चंद्र पालव, संतोष दिगंबर पालव, प्रभाग क्रमांक दोनमधून समीक्षा आंगणे, संजय दत्तात्रय सनये, प्रभाग क्रमांक तीनमधून चैताली चंद्रकांत भोगले, मानसी लक्ष्मण पालव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सरपंच पदासाठी रूपाली रामचंद्र नाईक, मानसी लक्ष्मण पालव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल. डी. गावडे यांनी काम पाहिले.
अकरा सदस्य संख्या व सरपंच पद असलेल्या मर्डे ग्रामपंचायतीसाठी प्रभाग क्रमांक एकमधून राजेश काशिनाथ गावकर, रिया शैलेश आंगणे, राघवेंद्र शिवराम मुळीक, आत्माराम तुकाराम गावकर, विकास विठ्ठल बागवे, प्रभाग क्रमांक दोनमधून मानसी संदीप चव्हाण, रमाकांत मोहन सावंत, अक्षय आत्माराम परब, सारिका हनुमंत मुणगेकर, महादेव शरद बागवे, भक्ती भगवान भोगले, प्रभाग क्रमांक तीनमधून स्नेहा चंद्रकांत परब, जगदीश परशुराम चव्हाण, अक्षय आत्माराम परब, सचिन चंद्रकांत पाटकर, पल्लवी पंढरीनाथ नाचणकर, प्रभाग क्रमांक चारमधून पूजा पांडुरंग ठाकूर, हीना अब्दुल रजाक सय्यद, पल्लवी पंढरीनाथ नाचणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सरपंच पदासाठी नारायण गणेश परब, संजय महादेव सावंत, संदीप पुंडलिक हडकर, राजेश काशिनाथ गावकर, विश्‍वास शंकर साठे, बिभीषण मारूती चव्हाण, समीर नारायण प्रभूगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र कांबळे यांनी काम पाहिले.
भाजपकडून काही उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले. सरपंच पदाचे उमेदवार संजय सावंत यांनी काही उमेदवारी अर्ज प्रतिज्ञापत्राशिवाय सादर झाले आहेत. जातीचा दाखला, पडताळणीची पावती जोडलेली नाही. त्यामुळे असे अर्ज बाद करावेत. अनामत रक्कम न भरलेले अर्ज ग्राह्य न धरण्याची तक्रार केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments