जावली गावात बंदुकीची गोळी लागून एक ठार

863
2
Google search engine
Google search engine

 

डुकराची शिकार करताना  गोळी लागल्यामुळे घडली दुर्घटना 

कणकवली, ता. १६ : शिकारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीला गोळी लागून तो जागीच ठार झाला आहे. जाणवली गावातील जंगलात सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. यात सखाराम मेस्त्री वय 45 असे त्याचे नाव आहे. तर बंदूक चालवणाऱ्या आरोपीचे नाव रविकांत गणपत राणे (जाणवली गणपती वाडी) असे आहे.
डुकराच्या शिकारीसाठी जाणवली गावातील काही मंडळी तेथील जंगलात गेली होती. यावेळी ही दुर्घटना घडली. जाणवली गावात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
जाणवले गावातील काही मंडळी आज शिकारीसाठी तेथीलच जंगलात गेली होती. यात सावजाचा अंदाज घेत आरोपी रविकांत राणे याने ठासणीच्या बंदूकीतून गोळी झाडली. मात्र ती डुकराला न लागता त्यांचा सहकारी सखाराम मेस्‍त्री याला लागली यात तो जागीच ठार झाला. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.