गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; एक बेपत्ता

2

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यासाठी गेलेले 3 पर्यटक बुडाल्याची घटना आज सकाळी सव्वा सात वाजता घडली. मचले कुटुंबातील आठ लोक पोहण्यासाठी गेले होते. त्या मधिल काजल रोहन मचले (वय १७)’ सुमन विशाल मचले (वय २५ दोन्ही रा.कसबा बावडा कोल्हापुर मुळ राहणार हुबळी कर्नाटक) हे पाण्यात बुडुन मयत झाले. त्यांच्यासोबत उमेश अशोक बागडे (वय २८ ) हा देखील बेपत्ता असुन त्याचा शोध सुरु आहे

दरम्यान पोहाण्यासाठी गेलेल्या मचले कुटुंबातील किसन जयसिंग मचले, पुजा उमेश बागडे, निर्मला जयसिंग मचले, ऐश्वर्या सुनिल मिनेकर यांना सुरक्षा रक्षक आणि जिवरक्षक यांनी वाचविले आहे.

0

4