वैभववाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर

232
2

पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते १५ अॉगस्टदिनी पदक बहाल

वैभववाडी ता.१७:गोँदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात सतत अडीच वर्षे उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल वैभववाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गोपाळराव बाकारे यांनी दाखविलेल्या कठीण व खडतर कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाकडून ‘विशेष सेवा पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. सदरचे पदक पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते १५ अॉगस्टदिनी बहाल करण्यात आले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी यापूर्वी सातारा, औरंगाबाद, गोंदिया जिल्ह्यात सेवा बजावली आहे. अॉगस्ट २०१६ पासून ते सिंधुर्गातील कुडाळ, निवती येथे त्यांनी सेवा बजावली असून जून २०१८ पासून वैभववाडी सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी पदभार स्विकारला.
श्री. बाकारे यांनी वर्षभरात धडाकेबाज कामगिरी केली. त्यांनी भुईबावडा येथील चोरी प्रकरण, उंबर्डे येथील दूरसंचार बॕटरी प्रकरण तसेच नाधवडे येथील ‘पोक्सो'(बालक लैंगिक कृत्ये संरक्षण कायदा २०१२) मधील डॉक्टर यांना तात्काळ अटक केली होती.

4