कुडाळ येथे शाश्वत बांधकाम संदर्भात “डिझाईन जत्रा ” कार्यशाळा…

2

कुडाळ ता.१७: वास्तुकलेचा नैसर्गिक सुसंवाद व्हावा,पर्यावरणीय आघात कमी व्हावेत,पर्यावरणास अनुकूल स्वरूपाच्या बांधकामांचा स्वीकार व्हावा,जागृती व्हावी या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा ब्रिफ डॉक्युमेन्टेशन कमिटीच्या वतीने सोमवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० ते दु ०१:०० या दरम्यान संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ या ठिकाणी डिझाईन जत्रा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पर्यावरण पूरक,निसर्गाला आघात किंवा त्यावर विपरित परिणाम होणार नाही याचा विचार करून बांधकाम कसे करावे या विषयी शार्दूल पाटील, प्रतीक धानमेर, विनिता चिरागिया तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.पूर्वीची घरे सिमेंट नसताना देखील1५० वर्षांपेक्षा जास्त दिवस खंबीर उभी आहेत व हल्ली निमार्ण केलेली १ वर्षात तडे गेलेली आढळतात आणि त्यात पर्यावरणावर यांचा विपरीत परिणार. जागतिक तापमान वाढीस कारणीभूत. या सारख्या अनेक घटकांचा विचार करून शाश्वत बांधणी विषयी व इतर घटकांविषयी माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे.तरी इच्छुक व्यक्तींनी नाव नोंदणी करीता प्रा. हसन खान 7875428653, प्रा. योगेश कोळी यांच्याशी संपूर्ण साधावा.

3

4