प्रथम स्मृती दिनानिमित्त वेंगुर्लेत भाजपा तर्फे आयोजन…
वेंगुर्ले ता.१७: उंची’,”परिचय’, ‘गाणे न म्हणतो मी’, मृत्यूशी भेट ठरली’ अश्या अनेकविध कविता, कव्यांनी अनेकांनी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना काव्यात्मक श्रद्धांजली वाहिली.देशाचे ११ वे पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त वेंगुर्ला येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ला व आनंदयात्री वामय मंडळ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना हि काव्यात्मक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली, नगराध्यक्ष राजन गिराप, वृंदा कांबळी, तालुकाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, महिला शहर अध्यक्षा सुष्मा प्रभुखानोलकर, साईप्रसाद नाईक, नगरसेवक सुहास गवंडळकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, वृंदा गवंडळकर आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रथम आदरांजली वाहिली आणि त्या नंतर उपस्थित कवी व नागरिकांनी त्यांना काव्य कवितेद्वारे आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उवस्थितांचे आभार प्रा.सचिन परुळेकर यांनी मानले.