वेंगुर्ले : ता.१७
जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग पुरस्कृत, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग आयोजित शिरोडा येथे युवतींकरीता स्वालंबनासाठी १ महिना कालावधीचे मोफत पर्यटनावर आधारीत आधुनिक सेवा तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये पर्यटनावर आधारीत उद्योग संधी, उद्योजकीय पाहणी तंत्र, उद्योग विषयक कायदे व रजिस्ट्रेशन, शासनाचे व बँकांचे कर्जविषयक धोरण व प्रकल्प अहवाल याबाबत माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांस १००० रुपये विद्यवेतन व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उमेदवार हा किमान ७ वी पास तसेच १८ ते ४५ वयोगटातील असावा. कोणत्याही वित्तीय संस्थेचा किंवा बँकेचा थकबाकीदार नसावा. इच्छुक उमेदवाराने अधिक माहितीसाठी गणेश अंधारी ९४२३३४१८८८ किंवा प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्गनगरी ०२३६२-२२८०६२ येथे २६ आॅगस्ट पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शिरोडा येथे पर्यटनावर आधारीत आधुनिक सेवा प्रशिक्षण कार्यक्रम
2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4