Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभंडारी समाजा मुळेच "मी" मोठा झालो...

भंडारी समाजा मुळेच “मी” मोठा झालो…

दीपक केसरकर;लवकरच भंडारी समाजाचे हक्काचे भवन उभे राहणार…

सावंतवाडी ता.१७: मी मोठा होण्यामागे भंडारी समाजाचे मोलाचे योगदान आहे.या समाजाच्या सहकार्यामुळेच आज मी आमदार ते मंत्री पदापर्यंत मजल मारली,असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित भंडारी समाजाच्या कार्यक्रमात केला.जिल्ह्यात भंडारी समाजाचे  हक्काचे भवन उभे राहावे,ही प्रलंबित मागणी आता पूर्ण होणार आहें.त्यासाठी आवश्यकते प्रयत्न सुरू आहेत.समाज बांधवांच्या मागणीनुसार लवकरच हे भवन कुडाळ येथे उभारले जाईल,असे आश्वासनही श्री.केसरकर यांनी यावेळी बोलताना दिले.

येथील नाथ पै सभागृहात तालुका भंडारी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटन अखिल भारतीय भंडारी समाज मंडळाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर,माजी आमदार शंकर कांबळी,उपसभापती संदीप नेमळेकर,अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर,मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर,गुरुनाथ पेडणेकर,जयप्रकाश चमणकर,ऍड संग्राम देसाई,सदीप परब,राजाराम म्हावळकर,हेमंत कळगुटकर,लक्ष्मण धुरी,शितल कांबळी,दाजी धुरी,ऋजुता कांबळी,देविदास आडारकर,सागर नाणोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.केसरकर पुढे म्हणाले,भंडारी समाजाचे उभारण्यात येणारे हे भवन ज्येष्ठ नाट्यकर्मी मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने उभारण्यात येणार आहे.समाज बांधवांच्या मागणीनुसार हे भवन कुडाळ येथे उभारण्यात येणार आहे.ते लवकरात-लवकर उभे रहावे यासाठी आर्किटेक खर्चाची तरतूद समाज बांधवांकडून करण्यात यावी.उर्वरित निधी शासना कडून उपलब्ध करण्यात येईल.भंडारी समाज सदैव माझ्या पाठीशी उभा राहिला आहे.त्यामुळे या समाजाच्या विकासासाठी मी सुद्धा त्यांच्या सदैव पाठीशी राहीन असेही त्यांनी सांगितले.
यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments