लखमराजे भोसले; कोसळलेल्या दरडींची केली पाहणी…
ओटवणे ता.१७: शिरशिंगे,असनिये येथील धोकादायक डोंगरांचे तज्ञ भूगर्भ शास्त्रज्ञाकडून सखोल सेर्वेक्षण होणे गरजेचे आहे.यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असून,भूगर्भ शास्त्रातील तज्ज्ञांना लवकरच पाचारण करून शिरशिंगे व असनिये येथील डोंगरांचे भु-सेर्वेक्षण केले जाणार आहे,अशी माहिती सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले यांनी असनिये येथे दिली.
सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले यांनी असनिये येथे कोसळलेल्या दरडींची पाहणी केली.तसेच असनिये प्राथमिक शाळेतील स्थलांतरित ग्रामस्थांची भेट घेत संवाद साधला. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर,एम. एल.सावंत,असनिये,घारपी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.असनिये हा त्यावेळच्या सावंतवाडी संस्थानचा भाग होता.या संस्थानच्या ऐतिहासिक हनुमंत गडावरील लोक आता असनिये येथे राहतात.या लोकांवर नैसर्गिक संकट ओढवल्याने त्यांची भेट घेण्यासाठी आल्याचे,श्रीमंत लखमराजे भोसले यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.असनिये,शिरशिंगे येथे मोठ्या प्रमाणात डोंगर खचून धोका निर्माण झाला आहे.राज्य शासनाच्या भूगर्भ तज्ज्ञांनी याची पाहणी केली आहे.मात्र हे डोंगर व डोंगरा लगतची लोकवस्ती कशी सुरक्षित राहील व त्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल,त्यासाठी शिरशिंगे,असनिये येथील धोकादायक डोंगरांचे तज्ञ भूगर्भ शास्त्रज्ञाकडून सखोल सेर्वेक्षण होणे गरजेचे आहे.यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असून,भूगर्भ शास्त्रातील तज्ज्ञांना लवकरच पाचारण करून शिरशिंगे व असनिये येथील डोंगरांचे भु-सेर्वेक्षण केले जाणार आहे व याचा अहवाल शासनास दिला जाणार आहे,असे श्रीमंत लाखमराजे यांनी सांगितले. युवराज श्रीमंत लखमराजे भोसले यांनी शिवकालीन श्री देव नितकारी,महालक्ष्मी मंदिरास भेट दिली