Thursday, December 12, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यातुळस येथील डोंगराखालील घरांबाबत लवकरच निर्णय...

तुळस येथील डोंगराखालील घरांबाबत लवकरच निर्णय…

दीपक केसरकर;जिल्हा परिषद सदस्य व भूगर्भ शास्त्रज्ञांच्या बैठकीत निर्णय…

वेंगुर्ले ता.१७:*
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस, पाल आदी ठिकाणी झालेल्या भुत्खननाबाबत पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर व भूगर्भ शात्रज्ञ यांच्यात बैठक पार पडली. यात भुत्खनन झालेल्या भागाचे परीक्षण करण्यात आले असून लवकरच याचा अहवाल प्राप्त होणार आहे. अहवाल मिळाल्यानंतर येथील ग्रामस्थांनी डोंगराखालील घरात राहायचे की नाही याबाबत निर्णय देण्यात येणार असल्याची महिती जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर यांनी दिली आहे.
तुळस जिल्हापरिषद मतदार संघाचे सदस्य नितीन शिरोडकर यांनी नुकत्याच आपल्या मतदार संघातील मातोंड, पेंडूर, पाल, होडावडा, तुळस आदी आपत्ती आलेल्या ठिकाणी भेटी देऊन आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत केली. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख शशिकांत परब, नितीन मांजरेकर, मातोंड उपसरपंच वासुदेव कोंडये, सदस्य सुभाष सावंत, सुखाजी परब, होडावडा सरपंच अदिती नाईक, अरविंद नाईक, सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी, जगदीश परब, घनश्याम नाईक, राजाराम गावडे, मांजरेकर यांच्यासहीत इतर उपस्थित होते.
यानंतर शिरोडकर यांनी याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी तुळस पलतड येथील तसेच पाल येथे भुत्खनन होऊन येथील घरांना धोका निर्माण झाला होता. याचा भूगर्भ शात्रज्ञ यांनी या डोंगर भागाचे परीक्षण केले असून पुढील दोन दिवसात याचा अहवाल पाप्त झाल्यानंतर पुढील निर्णय देण्यात येईल असे पालकमंत्री यांनी सांगीतले. तसेच या भागातील शेती बागायतींचे जे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई संबंधित निकषानुसार देण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे नुकसान झाले आहे त्यांचीही नुकसान भारपाई नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन निकषानुसार देण्यात येईल. या आपत्ती ओढवलेल्या आपत्तीमुळे नागरिक तसेच शेतकरी बागायतदार यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल असे पालकमंत्री यांनी आश्वासन दिल्याची माहिती श्री.शिरोडकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments