Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआदित्य ठाकरे १९ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

आदित्य ठाकरे १९ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

वेंगुर्ले ता.१७:  शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे १९ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते अकाली पावसामुळे उद्भवलेल्या पूरजन्य परीस्थितीची पाहणी करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांमधिल गावांमध्ये पूरस्थिती येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,त्या ठिकाणी श्री.ठाकरे पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहेंत.तरी या दौऱ्यात जास्तीत-जास्त शिवसेना,युवासेना,महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments