प्रमोद जठार; कणकवलीत अटलबिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदिन साजरा
कणकवली, ता.17 ः अटलजी शांत, धीरगंभीर आणि संयमी स्वभावाचे होते. त्याचबरोबर दूरदृष्टी, करारीपणा, सर्वसमावेशक नेतृत्व आणि राजकारणावरील पकड यामुळे ते यशस्वी राजकारणी म्हणून ओळखले गेले. त्यांचा विचारांचा आदर्श आणि त्यांचे मिळालेले मार्गदर्शनामुळेच आपण राजकारणात यशस्वी ठरलो असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रथम स्मृतीदिन येथील कणकवली भाजप कार्यालयात आज झाला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, युवा नेते संदेश पारकर यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संदेश पटेल, रवींद्र शेट्ये, रमेश पावसकर, राजश्री धुमाळे, गीतांजली कामत, प्राची कर्पे, प्रा.दिवाकर मुरकर, बबलू सावंत, पप्पू पुजारे, विजय चिंदरकर, संदीप बांदिवडेकर, प्रसाद जाधव, प्रदीप गावडे, समर्थ राणे, सदा चव्हाण आदी उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले, देशाच्या जडणघडणीत अटलजींनी मोठे योगदान दिले. त्यांनी आपले सर्व जीवन देशासाठी समर्पित केले. निव्वळ राजकारणच नव्हे तर त्यांनी पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातही वेगळा ठसा उमटवला.