वेंगुर्ले : ता. १७
श्री देव भैरव जोगेश्वरी मित्रमंडळ कुडाळने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पारंपारिक वारकरी भजन स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील श्री मोरया प्रासादिक वारकरी भजन मंडळ वायंगणी यांनी प्रथम तर अचानक भजन मंडळ वेंगुर्ले यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
श्री देव भैरव मित्रमंडळाने प्रथमच संगीत व वारकरी भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथम क्रमांक वायंगणी भजन मंडळाने पटकाविला. या मंडळातील बुवा गौरेश खडपकर, पखवाजवादक सौरभ खडपकर, प्रकाश खोबरेकर, सिद्धार्थ तोरस्कर, स्वयंम येरागी, अनंत तोरसकर, दिगबंर तोरस्कर, कुणाल खोबरेकर, महेश म्हाकले, दक्षत म्हाकले, सचिन खडपकर, राजेश कांबळी, हर्ष कांबळी, धनजंय नाईक व ओंकार खोबरेकर यांनी उत्कृष्ट भजन सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. तर द्वितीय क्रमांक अचनाक भजन मंडळ वेंगुर्ले यांनी मिळविला. या मंडळातील बुवा – भाऊ सातार्डेकर, पखवाजवादक – प्रसाद गुरव, अनिल मांजरेकर, नाना रेडकर, पंकज शिरसाट, सुदेश वेंगुर्लेकर, देविदास रेडकर, जयंत हळदणकर, सुमित कोंडुरकर, बाबू सातार्डेकर, रोहित रेडकर, मिथुन सातार्डेकर, बाळू किनळेकर,संदेश कुबल, डॉ.शशिकांत परब, विघ्नेश कोंडुरकर, मकरंद वेंगुर्लेकर, तेजस किनळेकर, चिन्मय हळदणकर यांनीही उत्कृष्ट भजन सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दोन्हीं संघाना बक्षिस देवून गौरविण्यात आले.