Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजानवली गोळीबार प्रकरणातील राणेला पोलिस कोठडी

जानवली गोळीबार प्रकरणातील राणेला पोलिस कोठडी

बंदूकही जप्त; मयत सखाराम मेस्त्री यांच्या डोकीला लागले दोन छरे

कणकवली, ता १७  जानवली गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी रविकांत उर्फ बाबू गणपत राणे याला चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. पोलिसांनी शिकारीसाठी वापरलेली काडतुसाची बंदूक देखील ताब्यात घेतली आहे. दरम्यान रविकांत राणे याने डुक्करावर मारलेली गोळी सखाराम महादेव मेस्त्री यांच्या दिशेने गेली. यात काडतुसाचे दोन छरे त्यांच्या डोकीत घुसल्याचे शवविच्छेदनावेळी स्पष्ट झाले.
गोळीबार घटनेनंतर आरोपी रविकांत राणे हे जानवली गावच्या पोलिस पाटलांसह काल (ता.16) सायंकाळी साडे सात वाजता कणकवली पोलिस स्थानकात बंदूकीसह दाखल झाले होते. तर घटना समजताच कणकवली पोलिसांनी जानवलीच्या जंगलमय भागात जाऊन सखाराम मेस्त्री यांचा मृतदेह ताब्यात घेतला होता. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता. आज सायंकाळी सहाच्या सुमारास तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सखाराम मेस्त्री यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
जानवली सखाराम मेस्त्री मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी रविकांत राणे याला कणकवली न्यायालयात हजर केले, त्यावेळी सरकारी पक्षातर्फे जानवली फणसुली जंगलात आरोपी रानटी डुक्कर मारण्याच्या उद्देशाने स्वतः:ची शेती संरक्षण परवाना बंदुक घेऊन मयतासह गेला होता. आरोपीने बंदुक डुक्काराच्या दिशेने झाडून आजूबाजूला असलेल्या इसमांना गंभीर दुखापतीची जाणीव असताना गोळी झाडली. ती गोळी मयत सखाराम मेस्त्री यांना लागून त्यांचा मृत्यू झाला. शेती संरक्षण परवाना बंदुक ही उपद्रव करणार्‍या प्राण्याची शिकार करण्यासाठी नसते. जर प्राण्याचा उपद्रव होत असेल तर त्या बाबत रीतसर वनक्षेत्रपाल यांच्याकडे पूर्व परवानगीसाठी अर्ज द्यावा लागतो. तशी परवानगी आरोपीने घेतली नव्हती. शिकारीचा प्रयत्न आरोपीने केला असून वन्यजीव कायद्याचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे आरोपी आणि मयतामध्ये पुर्ववैमनस्य होते का? काडतुसे कोठून आणली? आरोपीकडे आणखी दारूगोळा आहे का? या कारणांसाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी तपासी अधिकार्‍यांनी न्यायालयाकडे मागितली. कणकवली न्यायाधीश एस ए जमादार यांनी 20 ऑगस्टपर्यंत 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड गजानन तोडकरी यांनी बाजू मांडली

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments