पोस्टमनने लावला ग्राहकांना लाखो रुपयांना चुना

2

वेंगुर्ले तालुक्यातील घटना; ग्रामस्थांत खळबळ,तात्पुरते प्रकरण मिटवल्याची चर्चा…

वेंगुर्ले ता.१७: कुडाळ येथील पोस्टात अपहार घडल्याचे प्रकरण ताजे असताना वेंगुर्ल्यातील किनारपट्टी भागात असलेल्या एका पोस्टात चक्क पोस्टमनने तब्बल चार ते पाच लाखाचा घोटाळा केला आहे.त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
या बाबत ग्रामस्थांना माहिती मिळाल्यानंतर संबंधितांनी पोस्टात धाव घेऊन तेथील अधिकाऱ्यांनी त्या वादग्रस्त पोस्टमनला धारेवर धरल्यामुळे संबंधिताने आपण ती रक्कम परत करतो असे लेखी दिल्यामुळे विषय तात्पुरता मिटवला आहे.परंतु या विषयाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.किनारपट्टी भागात असलेल्या या गावात मच्छिमार व्यवसायिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी गावातील पोस्टात रक्कम भरण्यासाठी दिली होती.

12

4