नगराध्यक्ष साळगावकर:पालकमंत्री दीपक केसरकरांवर नाव न घेता टीका…
सावंतवाडी /शुभम धुरी ता.१७: भंडारी समाजाने फसव्या आवाहनाला भूलू नये.जो कोणी जिल्ह्याचा विकास करेल त्याच्या पाठीशी आगामी निवडणूक काळात ठामपणे उभे राहावे,असे आवाहन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित समाज बांधवांच्या मेळाव्यात केले.सेट टॉप बॉक्स देऊन येथील बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही.त्यासाठी प्रकल्प येणे गरजेचे आहे.नाणार सारख्या प्रकल्पाला विरोध होणे हे दुर्दैव आहे असेही यावेळी श्री.साळगावकर यांनी सांगितले.
भंडारी समाजाचा मेळावा आज येथे झाला.त्यांच्या भाषणापूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे भाषण झाले.यावेळी केसरकर यांनी भंडारी समाजाच्या पाठिंब्यामुळेच आपण राजकारणात यशस्वी झालो असे सांगितले.तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यातील लोकांना १ लाख सेट-टॉप-बॉक्स देणार आहे.अशी माहिती दिली त्यांच्या भाषणानंतर श्री.साळगावकर यांनी आपले मत मांडले.
यावेळी ते म्हणाले याठिकाणी भंडारी समाजाचा मोठा वाटा आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा,वीज,पाणी आदी प्रश्नांसोबत रोजगाराचा प्रश्न सुटण्यासाठी भंडारी समाजातील युवकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.मात्र हे करत असताना कुणी भंडारी समाजाबद्दल चांगलं बोलत असले तर फसव्या आव्हानांना बळी पडू नये असेही त्यांनी सांगितले.