शुभांगी सुकी यांच्याकडून कातवड शाळेतील विद्यार्थ्याना रेनकोटचे वाटप…

2

मालवण, ता. १८ : येथील लायनेस क्लबच्या सदस्या शुभांगी सुकी यांनी स्वखर्चातून कातवड शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट उपलब्ध करून दिले.
लायनेसच्या सदस्या असलेल्या सुकी यांनी यापूर्वीही कातवड शाळेतील गरजू विद्यार्थांसाठी शालोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी सुकी यांनी रेनकोट उपलब्ध करून दिले.
सुकी, मेघा सावंत, सुमन ओटवणेकर यांनी मुलांना खाऊसाठी पैसे दिले. यावेळी प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते.

0

4