ठाणे येथे झालेल्या अपघातात ओटवण्यातील युवक ठार

2

सावंतवाडी
ठाणे येथे झालेल्या अपघातात ओटवणे येथिल युवक जागीच ठार झाला.हा अपघात काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ठाणे येथे घडला.योगेश गावकर वय 26 असे त्याचे नाव आहे. दरम्यान आज त्याचा मृतदेह गावात आणण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की ओटवणे येथे राहणारा योगेश हा आपल्या सहकारी मित्रासमवेत कामानिमीत्त मुंबई येथे राहत होता.दरम्यान काल सायंकाळी कामावरुन दुचाकीने तो आपण राहत असलेल्या रुमवर परतत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने त्याला धडक दिली.
या अपघातात तो रस्त्यावर फेकला गेला. दरम्यान अपघात झाल्याचे लक्षात येताच ट्रकचालकाने पळ काढला. दरम्यान त्या ठीकाणी असलेल्या एका रिक्षा चालकाने त्याला तात्काळ तेथिल एका बाजूच्या रुग्णालयात दाखल केले.मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी ठाण्यातील ज्यूपिटर हॉस्पिटल मध्ये हलविण्याचा सल्ला वैदयकीय अधिकार्‍यांनी दिला. मात्र त्या ठीकाणी नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
ओटवणे येथे राहणारा योगेश हा मनमिळावू होता सावंतवाडीत महाविद्यालयीन शिक्षण आणी कामाला असल्यामुळे त्याचा मित्र परिवार मोठा होता. मात्र अचानक त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली त्याच्या पश्चात आई वडील भाउ असा परिवार आहे.

4