वेंगुर्ले पालिकेच्या स्वच्छता दौडला जिल्ह्याभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद…

183
2

नऊ जणांनी केले २१ कि.मी.चे अंतर पार…

वेंगुर्ले ता.१८:  नागरीकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व प्रबोधन करण्याबरोबरच लोकांना व्यायाम करण्यास प्रेरणा देत ‘स्वच्छ वेंगुर्ला, स्वस्थ वेंगुर्ला‘ या उद्देशाने वेंगुर्ल्यात स्वच्छता दौड आयोजित करण्यात आली होती. त्याला सिधुदुर्ग जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहानांपासून ते महिला व वृद्धांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेत दौड यशस्वी केली. रात्रौ ९ वाजता सुरु झालेली ही नाईट दौड मध्यरात्री १२ पर्यंत सुरु होती. यात ९ जणांनी २१ कि.मी.चे अंतर पार केले.
वेंगुर्ला-कॅम्प येथे वेंगुर्ला नगरपरिषद, वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन व रांगणा रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता दौडचे आयोजन केले होते. यात मुंबई, खारेपाटण, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली व वेंगुर्ला येथील नागरीकांसह, डॉक्टर्स, रांगणा रनर्सचे डॉक्टर, रांगणा रागिणी, महिला मिळून १७५ जण सहभागी झाले होते. या दौडचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी फ्लॅग दाखून केले. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, डॉ.प्रल्हाद मणचेकर, मालवणचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, मेडिकल असोसिएशनचे डॉ.राजेश्वर उबाळे, रांगणा रनर्सचे अभिजित वझे. उपस्थित होते. या दौडमध्ये डॉ.प्रशांत मडव, डॉ.शंतनू तेंडुलकर, डॉ.जयसिह रावराणे, डॉ.प्रशांत सामंत, डॉ.स्नेहल गोवेकर, डॉ.राजेंद्र शिरसाट (मुंबई), डॉ.सोमनाथ परब, डॉ.पिटर रॉड्रीक्स, डॉ.पॉलमिन फ्रान्सिस या ९ जणांनी २१ कि.मी.चे अंतर तर डॉ.प्रल्हाद मणचेकर, प्रदिप वेंगुर्लेकर, अभिजित वझे, डॉ.विकास कौरी, माधुरी शिरसाट, जयंत जावडेकर, डॉ.नामदेव मोरे, डॉ.संजना काजरेकर, डॉ.गार्गी आरोसकर या ८ जणांनी १५ कि.मी.चे अंतर पार केले.
तसेच ५५ जणांनी १०.कि.मी.चे अंतर तर ९५ जणांनी ५ कि.मी.चे अंतर पार केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रल्हाद मणचेकर, प्रदिप वेंगुर्लेकर, प्रशांत मडव, डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.नामदेव मोरे, डॉ.महिद्र, अभिजित वझे, डॉ. संजिव लिगवत, डॉ.आर.एम.परब, डॉ.अमेय प्रभूखानोलकर यांच्यासह जागृती कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, वेंगुर्ला नगरपरिषदेचे कर्मचारी यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरीकांचे सहकार्य लाभले. स्वच्छतेबरोबरच फिटनेस विषयक जनजागृतीसाठी नाईट रनचा हा उपक्रम हाती घेण्यात आला असून धावपटूंना आपला कस आजमाविण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. जिल्ह्याभरातून या दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

4