मंगेश तळवणेकर उतरणार सावंतवाडी विधानसभेच्या “आखाड्यात”…

2

सावंतवाडी ता.१८: जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर सावंतवाडी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.वंचित दुर्बल व तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे.असा दावा श्री तळवणेकर यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री तळवणेकर यांनी ब्रेकिंग मालवणी संपर्क साधून आपली भूमिका जाहीर केली.ते म्हणाले गेली अनेक वर्षे आपण समाजकारण करत आहे.या ३२ वर्षाच्या काळात रक्तदान तसेच रुग्ण सेवा देण्यासाठी आपण प्रयत्न केले.तब्बल नऊ हजार रक्ताच्या बाटल्या देण्याचे मोठे काम आपल्या हातून घडले.अनेक लोकांना रुग्णांना थेट गोवा बांबुळी पर्यंत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला.त्यामुळे येणाऱ्या काळात आपण विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे.गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रचाराला सुरुवात करणार आहे.
श्री.तळवणेकर यांचा प्रवास शिवसेनेपासून सुरू झाला.त्यानंतर ते कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जात होते सद्यस्थितीत ते अपक्ष म्हणून कार्यरत आहेत.गेल्या अनेक वर्षांच्या काळात सर्वसामान्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.जिल्हा परिषद सभापती असताना त्यांनी अनेकांना विविध क्षेत्रात संधी मिळवून दिली.गेले काही दिवस ते राजकारणापासून अलिप्त आहेत.

4

4