शिवसेनेच्या माध्यमातून गोठोस येथे ताडपत्री वाटप…

2

कुडाळ.ता,१८: शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या वतीने गोठोस येथे जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर यांच्या माध्यमातून गावातील लोकांना ताडपत्री या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन गोठोस जिल्हा परिषद शाळा नं १ येथे करण्यात आले होते.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश कविटकर,यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.श्री कविटकर म्हणाले जास्तीत जास्त शेतकरी लोकांनी या शिवसेनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या ताडपत्री वाटपाचा लोकांनी फायदा करून घ्यावा.या उपक्रमाचे श्री आमदार नाईक यांचे सर्व स्तरातून ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी
विभागप्रमुख कृष्णा धुरी ,गोठोस सरपंच सानिका डीगे, शाखाप्रमुख संतोष बांदेकर, शंकर नाईक ,विष्णू ताम्हणेकर, महादेव नाईक, गजानन लाड, पबी गोठोस्कर,आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

19

4