पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सिंधू प्रतिष्ठान व राजे प्रतिष्ठानचा हात…

137
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप:तीसहून अधिक कुंटूबियांना दिली मदत…

ओटवणे ता.१८  सावंतवाडी तालुक्यात भूस्खलनामुळे अनेक कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले आहे.स्थलांतरीत करण्यात आलेल्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबई येथील राजे प्रतिष्ठान व ओसरगाव येथील सिंधू प्रतिष्ठान या संस्था पुढे आल्या आहेत.या संस्थेतील युवकांकडून असनिये-कणेवाडी येथील स्थलांतरीत कुटुंबांना रविवारी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मुंबई येथील राजे प्रतिष्ठान या संस्थेने आपद्ग्रस्थाना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.राजे प्रतिष्ठान व ओसरगाव येथील सिंधू प्रतिष्ठानचे युवक ज्या ठिकाणी अपडेट्स ओढवली आहे,त्या भागात जाऊन मदतीचा हात पुढे करत आहेत.रविवारी या युवकांनी असनिये-कणेवाडी येथील स्थलांतरीत कुटुंबांना रविवारी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.यात 30 कुटुंबीयांना जीवनावश्यक किटचे तसेच कपड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठानचे विनय परब,गौरेश शिरोडकर योगेश्वर मोडक, गौरव मोडक, मनोज पारकर, निखिल साटम ,गणेश परब, यश परब,श्रीधर सावंत,सचिन कोलते,आपा सावंत आदी उपस्थित होते.

\