माणगाव येथील टेंबे स्वामींचा जयंती उत्सव २० ऑगस्ट रोजी…

2

माणगाव ता.१८: येथील श्री प पु.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचा जयंती उत्सव मंगळवार दिनांक २० ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे.यावेळी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात श्री प .पु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज जयंती निमित्त श्री चे जन्मस्थानी मंगळवार दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वा पासून नामस्मरण, अभिषेक ,पूजा, महापूजा ,दुपारी आरती ,तीर्थप्रसाद, दुपारी ३ वा पुराण वाचन, त्यानंतर जन्मोत्सवाचे कीर्तन, सायंकाळी४:४५ वाजता श्री चा जन्म सोहळा ,व सुंठवडा प्रसाद वाटप व श्री दत्त मंदिर मध्ये सकाळी अभिषेक पूजा ,महापूजा, दुपारी आरती ,तीर्थप्रसाद, व महाप्रसाद मंगळवार २० ऑगस्ट सकाळी आठ ८ते १०शुभयात्रा (पायी दिंडी) दत्त मंदिर ते हनुमान मंदिर माणगाव बाजार ते परत श्री दत्त मंदिर , सकाळी१०ते १२ ” गीत दत्तात्रेय “सादरकर्ते श्री . शरद दत्तात्रय घाग. व सहकारी यांचे कीर्तन, दुपारी १ ते २ कु श्रद्धा जोशी ,मिरज यांचे सुभाव्य गायन, ९ते११.ह .भ प. श्री शरद दत्तात्रय घाग, बुवा श्री नृसिंहवाडी यांचे कीर्तन,
बुधवारी दिनांक२१ ऑगस्ट रोजी श्री दत्त मंदिर मध्ये सकाळी अभिषेक पूजा ,लघु रुद्राभिषेक, महापूजा, दुपारी आरती तीर्थप्रसाद ,व महाप्रसाद, आदी कार्यक्रम होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

4

4