पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात…

147
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१८: पूरग्रस्त परिस्थितीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या सावंतवाडी व दोडामार्ग भागात येणार आहेत.ज्या गावांमध्ये पूरस्थिती येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,त्या-त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी यासाठी ते विशेष प्रयत्न करणार आहेत.
यावेळी त्यांचा दौरा पुढील प्रमाणे राहणार आहे.दोडामार्ग-सकाळी १०:३० मणेरी,११:२५ सासोली,दुपारी १२:०५ झोळंबे ,तर सावंतवाडी: दुपारी १२:३० असनिये / घारपी,१:१० बांदा,,२:२० दाभीळ,३:४० शिरशिंगे,४:४५ आंबोली आदी गावांना ते भेटी देणार आहेत.यावेळी शिवसेना, युवासेना, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोस्कर यांनी केले आहे.

\