वैभववाडी स्वाभिमान पक्षाच्या युवकांचा भाजपात प्रवेश

2

वैभववाडी ता.१८: येथील स्वाभिमान पक्षाचे कार्यालय प्रमुख उदय पांचाळ, कोकिसरे जि. प. विभागीय युवा अध्यक्ष गुरूप्रसाद मुद्रस, निमअरुळेचे बुथप्रमुख बिपीन रावराणे यांच्यासह १६ युवकांनी भाजपा नेते अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टीचा ‘गावभेट कार्यक्रमांतर्गत’ वैभववाडी बुथ निहाय जनसंपर्क अभियान राबवत असताना भाजप नेते अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमान पक्षाच्या सोळा युवकांनी प्रवेश केला.
यावेळी युवा जिल्हा संयोजक प्रसाद मेहता, तालुका सरचिटणीस किशोर दळवी, कार्यालय प्रमुख अनंत फोंडके, महेश रावराणे, संतोष बोडके आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीच्या प्रेरणेतून प्रभावित होवून या सर्वांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

1

4