Saturday, November 2, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारेडी- कनयाळ मधील आपदग्रस्त महिलांना साड्यांचे वितरण...

रेडी- कनयाळ मधील आपदग्रस्त महिलांना साड्यांचे वितरण…

श्री.देवी नवदुर्गा समितीच्यावतीने मदत; ५२ साड्यांची भेट…

वेंगुर्ले.ता,१८: तालुक्यातील रेडी – कनयाळ येथील श्री.देवी नवदुर्गा देवस्थान समितीच्या वतीने आपदग्रस्त महीलांना वितरित करण्यासाठी ५२ नवीन साड्या वेंगुर्ले येथील भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्याकडे सुपूर्त केल्या.
संपूर्ण वेंगुर्ले तालुक्यात गेले आठ ते दहा दिवस भारतीय जनता पक्षाच्या वतीने नुकसानग्रस्त भागात त्या – त्या भागातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना सोबत घेऊन तातडीची मदत पोहचवीण्याचा प्रयत्न करीत आहेत. याची दखल घेऊन श्री. देवी नवदुर्गा समिती रेडी – कनयाळ यांच्या मार्फत ५२ नवीन साड्या – ब्लाउजपीस सहीत श्री. देसाई यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी श्री.देवी नवदुर्गा देवस्थानचे व्यवस्थापक राजीव गावसकर, प्रताप गावसकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments