कोकणातील सहा नेते लवकरच भाजपात येणार

385
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आमदार प्रसाद लाड  : कणकवलीसाठी इच्छुक नाही

कणकवली, ता.१८ : विविध पक्षातील ताकदवान नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. कोकणातील विविध जिल्ह्यातून विविध पक्षातील 6 राजकीय नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती भाजपचे कोकण विभाग पक्षनिरीक्षक आमदार प्रसाद लाड यांनी दिली. कणकवली विधानसभेसाठी मी इच्छुक नाही या मतदारसंघात जठार यांच्यासह पारकर, रावराणे, भांडारी हे चार नेते इच्छुक असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत वाटप कार्यक्रमासाठी आमदार प्रसाद लाड सिंधुदुर्गात आले होते. यावेळी त्यांनी कणकवली भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीत विविध पक्षातील ताकदवान नेते येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोकणातील विविध जिल्ह्यांमधून येत्या काही दिवसात अन्य पक्षातील सहा राजकीय नेते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. कणकवली विधानसभा मतदार संघातून प्रमोद जठार, संदेश पारकर, माधव भंडारी, अतुल रावराणे हे प्रमुख चार नेते इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदार संघातून मी इच्छुक नसून, पक्ष ज्या मतदार संघात लढायला सांगेल त्याठिकाणी उभा राहीन. सध्यातरी मी विधानपरिषदेचा आमदार आहे. स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन होणार आहे? याबाबत चर्चा ही राष्ट्रीय पातळीवर असेल कारण, ना. अमित शहा, खा. नारायण राणे हे दोन्ही मोठे नेते आहेत. त्यामुळे मी छोटा माणूस याबाबत बोलू शकत नाही, अशी बचावात्मक भूमिका देखील प्रसाद लाड यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना घेतली.

\