आमदार प्रसाद लाड ः पूरग्रस्त कुटुंबीयांना १० हजार ५०० किट्स वाटप
कणकवली, ता.18 ः कोकणातील अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील भातशेतीची नुकसानी झालीय. तर ऊसशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. त्यामुळे कोकणातील शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली. तसेच कोकणातील पूरग्रस्त 10 हजार 500 कुटुंबीयांना अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत किट्स वाटप झाल्याचीही माहिती त्यांनी दिली.
कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालय श्री.लाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीता लाड, अतुल रावराणे, तालुकाध्यक्ष संदेश पटेल, समर्थ राणे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.लाड म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातुन पुरात बाधित असलेल्या कुटुंबीयांना दिलासा देण्याच्यादृष्टीने आमचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत 10 हजार 500 किट्स वाटप झाले आहे. यात चटई, चादर, खाण्याच्या वस्तू, सॅनिटरी पॅड, अंतरवस्त्र व इतर साहित्याचे एकत्रित पॅक करण्यात आले आहे. याखेरीज विद्यार्थ्यांसाठी दप्तर, पुस्तके, वॉटर बॅग, बूट, शालेय कपडे व अन्य साहित्य आम्ही देत आहोत. भाजप सरकारकडून डून घराच्या पडझडीतील बाधितांना तातडीची 16 हजाराची मदत तसेच भांडी, कपडे, घरदुरुस्तीसाठी दिली जात आहे. पूर्वीच्या शासनापेक्षा भाजप सरकारने मदतनिधीत कित्येक पटीने वाढ केली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गातील एक गाव दत्तक घेणार
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव दत्तक मी घेणार आहे. या गावातील पायाभूत सुविधांबरोबरच आदर्श गाव बनविण्याची संकल्पना माझी आहे असे श्री.लाड म्हणाले.