शिरशिंगे-गोठवेवाडीत आरोग्य शिबीर संपन्न;९० जणांनी घेतला लाभ…

2

सावंतवाडी ता.१८: शिरशिंगे गोठवेवाडी येथील डोंगर खचल्यामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांची आज आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी तब्बल ९० जणांनी या तपासणीचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे आयोजन सह्याद्री फाऊंडेशन,भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय,कलंबिस्त ज्ञान मंदिर वाचनालय आणि कलंबिस्त दुग्ध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या गावातील वातावरण भौगोलिक परिस्थिती पाहता येथील जनता भयभीत झाल्याने या भागातील लोकांचे कौन्सिलिंग केले जाणार आहे.वर्षभर आरोग्य अभियान मोहिम हाती घेण्यात येईल,असे फाउंडेशनचे अध्यक्ष संजू परब यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.गोठवेवाडी येथे रविवारी १८ ऑगस्टला एक दिवसाचे आरोग्य अभियान घेण्यात आले.
यावेळी आयुर्वेदिक कॉलेजचे डॉ.राजेश कुमार मिश्रा,डॉ.विशाल पाटील डॉ.प्रियांका पाटणकर,संचालक उमाकांत वारंग,दुग्ध सोसायटीचे चेअरमन संतोष सावंत,माजी सभापती रवींद्र पाडगावकर,माजी प सदस्य रमेश सावंत,पंढरी राऊळ,सरपंच रेखा घावरे,वाचन मंदिरचे संचालक जीवन लाड,माजी सरपंच सुरेश शिर्के,प्रांजल उंद्रे,श्रेया मोरे,पुनम जगताप,सोनल व्हटकर,दीक्षा वाळके,श्रावणी गोवेकर,आरती मराठे,सुभाष सुर्वे,कृष्णा चव्हाण,महादेव शिर्के,निवृत्ती घावरे,नम्रता घावरे,वसंत घावरे,गणपत राणे,गोविंद कदम,बाळकृष्ण पेडणेकर, वसंत शिर्के आदी उपस्थित होते.

4