माझ्या पाठपुराव्यामुळे बांद्यातील व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास मदत…

2

दीपक केसरकर; प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय…

बांदा ता.१८  शहरात आलेल्या महापुरात सर्वाधिक नुकसान हे व्यापारी बांधवांचे झाले. मात्र व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद शासन दरबारी नव्हती.आपण स्वतः हा मुद्दा मंत्रीपरिषदेत उपस्थित करून भरपाई देण्याची मागणी केली. त्यामुळे पुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना ५० हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. उद्यापर्यंत याचा शासकीय अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.
बांदा व्यापारी भुवन येथे नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची भेट मंत्री केसरकर यांनी घेतली. त्यावेळी शासन निर्णयाची माहिती त्यांनी दिली.
यावेळी मंडळ अधिकारी आर. वाय. राणे, तलाठी फिरोज खान, व्यापारी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, विभागप्रमुख मकरंद तोरसकर, स्वप्नाली पवार, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, सुशांत पांगम, अर्चना पांगम आदींसह व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

18

4