बांद्यातील पूरग्रस्तांना आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते मदत वाटप…

2

बांदा ता.१८: महापुरात कोकणातील जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे.यासाठी कोकण व नाशिक विभागासाठी दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज पूरग्रस्तांना शासनाने मंजूर केले आहेत. पुढील पाच वर्षे दुष्काळ व पूर मुक्त अभियान आम्ही महाराष्ट्रात राबविणार आहोत.यामुळे भविष्यात नुकसानीची तीव्रता कमी होणार आहे. मी येथील जनतेसाठी सर्वतोपरी कार्यरत राहीन अशी ग्वाही भाजपचे कोकण संपर्कप्रमुख आमदार प्रसाद लाड यांनी येथे दिली.
येथील संतोषीमाता मंगल कार्यालयात आयोजित पुरबाधितांना मदत वाटप कार्यक्रमात आमदार लाड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता लाड, संदेश पारकर, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, सरपंच मंदार कल्याणकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, अतुल रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बांदा, शेर्ले, इन्सुलि, वाफोलि, आरोसबाग आदी परिसरातील शेकडो पूर बाधितांना आमदार लाड यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.

15

4