मटका स्वीकारल्याप्रकरणी मळगाव येथे एकावर कारवाई…

2

सावंतवाडी,ता.१४: मटका स्वीकारल्याप्रकरणी निरवडे येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज दुपारी १ वाजण्याची सुमारास मळगाव पोलीस चेक पोस्ट परिसरात करण्यात आली. रामचंद्र दत्ताराम कोनाळकर असे त्याचे नाव आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाकडून करण्यात आली. त्याच्याकडून ७५० रुपयांचा रोकड व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार हवालदार चंद्रकांत पालकर यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार त्याच्या विरोधात मटका प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस हवालदार लक्ष्मण काळे यांनी सांगितले.

295

4