गणेशोत्सवात अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी नियोजन करा…

2

वीज ग्राहक संघटनेची मागणी; सावंतवाडीतील अधिकाऱ्यांना निवेदन…

सावंतवाडी,ता.१४: गणेशोत्सव कालावधीत तालुक्यात अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेच्यावतीने वीज वितरण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री. चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वय नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, समन्वय बाळ बोर्डेकर, सदस्य पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.

86

4