युवक काँग्रेसच्यावतीने खड्डयांची छायाचित्र स्पर्धा…

2

२५ ऑगस्टला छायाचित्रांचे प्रदर्शन ; विजेत्यांना आकर्षक पारितोषिके…

मालवण, ता. १८ : युवक काँग्रेसच्यावतीने मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघात ‘माझ्या गावातील सुंदर खड्डा’ ही खड्ड्यांची छायाचित्र स्पर्धा भरविण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या स्पर्धकांनी आपल्या गावातील किंवा मालवण-कुडाळ तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे छायाचित्र १९ ते २४ ऑगस्ट या कालावधीत द्यावे असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे यांनी केले आहे.
या छायाचित्रांचे प्रदर्शन २५ ऑगस्टला भरविण्यात येणार आहे. जास्त लाईक मिळणार्‍या छायाचित्राला या स्पर्धेतील आकर्षक छायाचित्र ठरवून त्याला प्रथम क्रमांक दिला जाणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन छायाचित्रांना अनुक्रमे १ हजार रुपये, ६०० रुपये, ५०० रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर मोबा. ९८९२०५५८२० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री.लुडबे यांनी केले आहे.

16

4