वाढदिवसाच्या निमित्ताने भेट:तरूणांना साथ दिली पाहीजे केले सुचक वक्तव्य…

2

राणे समर्थक संजू परबांना पालकमंत्री व केंद्रीय मंत्र्यांकडुन शुभेच्छा…

सावंतवाडी.ता,१९: पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा कट्टर राणे समर्थक संजू परब यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली.यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत उपस्थित होते..
दरम्यान परब यांच्या वडिलांच्या आशीर्वादामुळे मी मंत्री झालो. त्यांनी पूर्वीच मला तसा आशीर्वाद दिला होता.आता भविष्यात आणखी काही बदल दिसतील. युवा तरूणांना साथ दिली पाहीजे असे सूचक वक्तव्य केसरकर यांनी केले.
श्री केसरकर यांनी श्री परब यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तरूणांना साथ दिली पाहीजे असे म्हणाले तर केंद्रीय मंत्री सावंत यांनी मी वेगळ्या कामासाठी आलो आहे, परंतु त्याच वेळी परब यांचा वाढदिवस होता, वाढदिवस कोणासाठी थांबत नाही .त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. यावेळी सौ संजना परब, राजू बेग, पंढरी राऊळ, शब्बीर मणियार, रुपेश राऊळ आदी उपस्थित होते.

20

4