अर्चना घारेंकडून चाकरमान्यांसाठी विशेष बसची सुविधा…

2

तीन दिवस मिळणार लाभ; पिंपरीतील सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे सहकार्य…

सावंतवाडी,ता.१७: पुणे व पिंपरी-चिंचवड वरून चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांच्या माध्यमातून अल्प दरात विशेष लक्झरीची सोय करण्यात आली आहे. १६ पासून १८ सप्टेंबर पर्यंत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी-चिंचवड यांचे सहकार्य मिळाले आहे. या सेवेचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन सौ. घारे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. काल रात्री उशिरा या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. कोकणात येणाऱ्या गाड्या मिळवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सौ. घारे यांनी पुढाकार घेतला असून पुणे व पिंपरी-चिंचवड मधून येणाऱ्या चाकरमान्यांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी सागर गावडे, गजानन परब, समीर दळवी, अमित वारंग, सुनील वझे, सुदन गवस, सदाशिव मोरजकर व सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

168

4