स्थानिकांना न्याय देण्यासाठी यापुढे शिक्षकांची बदली प्रक्रियाच रद्द…

2

शिक्षणमंत्र्यांची सावंतवाडीत घोषणा ; ३० हजार नव्याने शिक्षक, बाकीच्यांनी माफ करावे…

सावंतवाडी,ता.१८: स्थानिक उमेदवारांवर अन्याय होवू नये यासाठी यापुढे होणार्‍या शिक्षक भरती प्रक्रियामध्ये बदली प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यातील लोक या ठिकाणी येणार नाहीत आणि स्थानिकांवर अन्याय होणार नाही, अशी घोषणा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली.

दरम्यान पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी तब्बल २ लाख २५ हजार विद्यार्थी भरले आहेत. त्यातील ३० हजार विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. या ठिकाणी १०० टक्के सर्वांनाच न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे डी.एड, बी.एड उमेदवारांनी मला माफ करावे, अन्य लोकांना अन्य ठिकाणी न्याय मिळवून दिला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले. गणेश चतुर्थीच्या पुर्वसंध्येला श्री. केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हावासीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी ते पुढे म्हणाले, मी शिक्षण मंत्री असलो तरी एखाद्या जिल्ह्यासाठी वेगळा निकष लावता येत नाही. त्यामुळे एकदा भरती झाल्यानंतर संबंधित शिक्षकाला बदली करता येणार नाही. जेणे करुन सांगली, सातारा किंवा अन्य जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी आल्यास त्याला त्याची सेवा संपेपर्यत एकाच जिल्ह्यात रहावे लागणार आहे. बदली होणार नाही, असा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फटका बसणार असल्यामुळे अन्य जिल्ह्यातील उमेदवार आपला जिल्हा सोडुन अन्यत्र जाणार नाहीत. आणि स्थानिक उमेदवारांना आपसुकच न्याय मिळणार आहे, असे केसरकर म्हणाले.

419

4