स्वच्छतेत आघाडी “आपली वाडी सावंतवाडी…!!”

2

पालिकेच्या माध्यमातून स्वच्छता पंधरवडा; सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांचा सहभाग…

सावंतवाडी,ता.१८: स्वच्छता पंधरवडा अंतर्गत इंडियन स्वच्छता लीगच्या माध्यमातून १५ ते १७ सप्टेंबरला सावंतवाडी शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना सहभागी करुन घेत “पिकपअ प्लास्टिक” मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सर्व गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात मोठा असल्याने इंडियन स्वच्छता लीग मध्ये सावंतवाडी नगरपरिषदेने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी करून घेतले.

यामध्ये श्री नरसोबा मित्रमंडळ, हनुमान मंदिर उत्सव कमिटी उभा बाजार, हनुमान बालगोपाळ मित्र मंडळ चितारआळी, गणेशोत्सव पोलीस गणेशमंडळ यांनी सहभाग घेतला. त्यासाठी माझी आरोग्य सभापती आनंद नेवगी, शुंभागी सुकी व मंडळातील इतर सदस्य, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, अरुण भिसे, बंड्या कोरगावकर, राघू चितारी, पोलीस कर्मचारी श्री. राणे, राखी सावंत, श्री. महेंद्र कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले. मंडळ तसेच सावंतवाडी नगर परिषदेने सर्व शाळांना स्वच्छता पंधरवडा निमित्त शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राणी पार्वती देवी हायस्कूल, कळसुलकर हायस्कूल येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच सर्व शाळांमध्ये प्लास्टिक फ्री, थर्माकाॅल फ्री सजावट करण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार मिलाग्रीस तसेच मदर क्वीन शाळा येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. याकरिता सर्व शाळांचे मुख्याध्यापकांनी मोलाचे सहकार्य दिले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता रॅलीमध्ये पंचम खेमराज महाविद्यालय एनएसएस, एनसीसी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच माननीय माजी नगरसेवक, नगरसेविका, आनंद नेवगी, शुभांगी सुकी भारती मोरे दीपाली भालेकर, दीपाली सावत, अन्नपूर्णा कोरगावकर आणि सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले हे देखील सहभागी झाले होते. सावंतवाडी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सावंतवाडी शहरातील विविध वॉर्ड मधील महिला या स्वच्छता रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या यामध्ये माझी माती माझा देश अंतर्गत वाॅर्ड मधून माती किंवा तांदूळ आणून कलशामध्ये संकलन करण्यात आले यावेळी सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सागर साळुंखे यांनी स्वच्छतेबद्दल तसेच स्वच्छता पंधरवडा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात सहभागी सर्वाचे आभार व्यक्त केले. तसेच शहिदांचे स्मरण करून रली मोती तलाव केशवसुत कट्टा रामेश्वर मार्गे जाऊन नगर परिषदेत सांगता झाली. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन प्रशासक प्रंशात पानवेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

69

4