सावंतवाडीच्या खुशल व राजकुमारीची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड…

2

सावंतवाडी,ता.१८: येथील उपरकर शूटिंग रेंजच्या राजकुमारी बगळे व खुशल सावंत यांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नुकत्याच अहमदाबाद, गुजरात येथे संपन्न झालेल्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये सिंधुदुर्गतील नेमबाज सहभागी झाले होते. यात कु.राजकुमारी संजय बगळे (कुडाळ) हिची एअर पिस्तूल प्रकारात ४०० पैकी ३४२ गुणांसह मुलींच्या सब युथ गटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली झाली आहे. ही खेळाडू वेंगुर्ला येथील उपरकर शूटिंग अकॅडमी मध्ये नेमबाजीचा सराव करत आहे. त्याचप्रमाणे एअर रायफल प्रकारात कु.खुशल संभाजी सावंत (यशवंतराव भोसले स्कूल)सावंतवाडी याने मध्य प्रदेश,इंदोर येथे झालेल्या ३२ व्या ऑल इंडिया जी. व्ही मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये ४०० पैकी ३६५ गुण मिळवत मुलांच्या सब युथ गटात राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. हा खेळाडू सावंतवाडी येथील शूटिंग रेंजवर नेमबाजीचा सराव करत आहे. या दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण मिळाले. तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

रायफल प्रकारातील ६६ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा नोव्हेंबर मध्ये डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज दिल्ली येथे होणार आहेत. तर याच वेळी पिस्तूल प्रकारातील स्पर्धा एम. पी शूटिंग अकॅडमी भोपाळ, मध्य प्रदेश येथे होणार आहेत. या स्पर्धांमध्ये हे खेळाडू सहभागी होतील.

निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंचे उपरकर शूटिंग अकॅडमी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

114

4