स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करा: पांडुरंग थोरात…

154
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१८: “आजचे युग हे स्पर्धात्मक आहे.विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेकविविध स्पर्धा परिक्षांची संधी उपलब्ध आहे.मात्र ह्या स्पर्धात्मक परिक्षांमध्ये उत्तम यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक ज्ञान मिळविणे व स्वतःच्या अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे”, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वित्त व लेखाधिकारी पांडुरंग थोरात यांनी सावंतवाडी येथे केले.
सावंतवाडी शहरातील महेंद्र स्पर्धा परीक्षा क्लासेसतर्फे आगामी स्पर्धात्मक परिक्षांच्या तयारीसाठी एकदिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी मुख्य मार्गदर्शक जिल्ह्याचे वित्त व लेखा अधिकारी पांडुरंग थोरात यांनी मार्गदर्शन केले.श्री.थोरात म्हणाले की,”सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी आगामी स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी महेंद्र क्लासेसची अभ्यासिका निश्चितच वरदान ठरेल.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी मुळातच कुशाग्र व चाणाक्ष बुद्धिमत्ता असलेले आहेत.मात्र स्पर्धात्मक परिक्षांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शन अभावी टिकत नाही.सावंतवाडी शहराचे महेंद्रचे सदर दालन विद्यार्थ्यांसाठी दिपस्तंभासमान मदत करेल”,असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.यावेळी अकॕडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले,”आपल्या सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी आम्ही प्रामाणिकपणे व योग्य असे दालन उपलब्ध केले असून सिंधुदुर्ग जिल्हा हा यापुढे अधिकारींचा जिल्हा म्हणून ओळखला जावा,हेच स्वप्न उराशी बाळगून जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परिक्षांचा ध्यास ठेवावा.”
कार्यशाळेचे प्रास्तविक कु.साक्षी पेडणेकर यांनी केले.सूत्रसंचलन विशाल गाड यांनी तर आभार प्रदर्शन पियुषा वारंग यांनी केले.चित्रा गडेकर,समिक्षा सोनवडेकर,तन्वी परब,वसंत पेडणेकर,सुशांत जाधव,ममता पेडणेकर आदींनी संयोजन केले.

\