सावंतवाडीच्या राजकारणातील “किंगमेकर” संजू परब…

2

अमोल टेबकर

________________

सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून अल्पावधीत आपली ओळख तयार करणारे सावंतवाडी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी होत आहे.शिवसेना शाखाप्रमुख ते तालुकाध्यक्ष असा प्रवास करून एक यशस्वी उद्योजक अशी आपली ओळख त्यांनी अल्पावधीत निर्माण केली आहे.त्यामुळे येणा-या काळात श्री.परब यांना भविष्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात संधी मिळावी आणि सर्वसामान्य माणसाच्या मनातील लोकप्रतिनिधी आणि भविष्यातील ते आमदार व्हावेत अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे.त्यांच्या या सर्व पुढील प्रवासाला ब्रेकिंग मालवणी परिवाराकडून कडुन हार्दिक शुभेच्छा
सच्चिदानंद उर्फ संजू परब हे नाव आज सावंतवाडी तालुक्यात प्रत्येकांच्या तोंडात सहज ऐकायला मिळते.एक राजकारणी म्हणूनच नाही तर एक समाजसेवक,मदतीला धावून येणारा म्हणून संजू परब आज सर्वत्र ओळखले जातात.त्यांनी आपल्या कार्याच्या जोरावर व्यवसायाबरोबरच राजकारणात यशस्वी झेप घेतली आहे.त्यांची आत्तापर्यतची कारकीर्द लक्षात घेता समाज्यातील सर्वानाच एक प्रकारे उर्जा देणारी आहे.
संजू परब यांचा जन्म एका मध्यमवर्गी घराण्यात झाला.त्यांचे वडील जिल्हा परिषद बांधकात विभागात शासकिय नोकरीला होते.पहीली ते पाचवी हे प्राथमिक शिक्षण त्यांनी जिल्हा परिषद शाळेत घेतले,त्यानंतर पुढे दहावीपर्यतचे शिक्षण सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कुल येथे होऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले.शिक्षण पुर्ण होताच महत्वाकांक्षी असलेल्या परब यांना स्वस्थ बसवेना,नोकरिच्या मागे न लागता स्वत:च्या हिमतीवर उभे राहायचे असा चंग त्यांनी मनात बांधला.
वडीलांनी त्यांना दिलेल्या दिड लाख रूपयाच्या जोरावर त्यांनी शेतीत उतरण्याच्या निर्णय घेत मडुरा येथील गावी स्वत:च्या जागेत आंबा काजु,केळी लागवड केली.या शेतीतुन मिळणारे उत्पादन संजू परब यांनी बांदा बाजारापेठेत विकले त्यात त्यांना मोठा आर्थिक फायदा झाला।याकाळात आई-वडीलांनीही परब यांच्या पाठीवर शाबासकिचा हात ठेवत प्रामाणिक काम कर,जीवनात तुला असेच यश मिळत जाईल असे आशिवार्द दिले.आणि परब यांनी यानंतर मागे वळून पाहिले नाही.
शेतीत यश मिळविलेल्या परब यांनी त्यांनतर बांधकाम व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.येथेही यश मिळताच संजू पबर यांनी जमिन खरेदी विक्र्रि व्यवसात उडी घेतली.या क्षेत्रात त्यांना सुरवातीपासून खुप मेहनत घ्यावी लागली.कालांतराने याठिकाणीही त्यांनी आपला जम बसवित यश मिळविले.राजकारणातही त्यांची एन्ट्री अनपेक्षितपणे झाली.श्री.परब हे समाजकारणात सुरवातीपासुनच असल्याने ते खासकिलवाडा भागात समाजकार्यात व्यस्त असतांना त्यांची ओळख ही त्यावेळेचे शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज नाईक यांच्याशी झाली.आणि शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून त्यांनी आपल्या राजकिय प्रवासाला सुरवात केली.शाखा प्रमुख ही जबाबदारी पार पाडत असतांना २००९ च्या लोकसभा निवडणुुकित प्रचारादरम्यान परब यांचा माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्याशी संपर्क आला.आणि राणे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास टाकत परब यांनी आपली पुढील वाटचाल सुरू केली.दरम्यानच्या काळात परब यांच्यावर कॉग्रेसच्या युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदररी सोपविण्यात आली.ही जबाबदारी पार पाडतांना त्यांनी जिल्हयात युवकांची फळी तयार केली.याची दखल घेतांनाच त्यांच्यावर सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.जबाबदारीचे पद आले म्हणून संजू परब यांनी न डगमगता कार्यकर्त्याना सोबत घेऊन या पदाला साजेचा न्याय देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा विश्‍वासू कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केली.आणि सावंतवाडी नगरपालिकेत १७-० असा आकडा असलेल्या ठिकाणी २०१७ च्या निवडणुकित आठ नगरसेवक निवडून आणत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविली,याच आत्मविश्‍वासाच्या जोरावर परब यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद पाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकितही घवघवीत यश संपादित करत स्थानिक आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनाच आव्हान निर्माण केल आहे.
आजही परब हे नारायण राणे यांनी काढलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात काम करत आहेत.तालुकाध्यक्ष या नात्याने पक्षाची जबाबदारी पार पाडतांना परब हे कुंटूबियाना जास्त वेळ न देता पक्षाचे प्रामाणिक काम करत आहेत.सावंतवाडी तालुक्यात स्वाभिमान पक्ष वाढविण्यात संजू परब यांचा मोठा वाटा आहे.सावंतवाडी तालुक्यातच नव्हे तर विधानसभा मतदार संघात संजू यांनी आपले वलय निर्माण केल्याने संजू यांना माननारे इतर पक्षातील लोकही त्यांचे खास मित्र आहेत.आणि म्हणूनच या मतदार संघात दिपक केसरकर यांना टक्कर देणारी व्यक्ति म्हणून संजू परब यांची स्वाभिमान पक्षाचा प्रबळ दावेदार अशी ओळख निर्माण झाली आहे.

43

4